पोरबंदर :
गुजरातच्या पोरबंदर येथील नौदलाच्या तळानजीक परीक्षणादरम्यान एक ड्रोन समुद्रात कोसळला आहे. या ड्रोनचे संचालन एक दुकानदार करत होता. या इसमाकडून ड्रोन कुठल्या कारणासाठी वापरला जात होता याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. तर संबंधित ड्रोन ताब्यात घेत अधिक तपास केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.









