रशियाकडून युक्रेनवर आरोप
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे शहर पेस्कोव येथील विमानतळावर ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 4 आय1-76 सैन्य विमाने नष्ट झाली आहेत. या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याचे सांगण्यात आले. गव्हर्नर मिखाइल वेदरनिकोव्ह यांनी या हल्ल्याची पुष्टी दिली आहे. रशियाचे सैन्य सातत्याने आकाशातील ड्रोन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. पेस्कोव्ह विमानतळावरील सर्व विमानो•ाणे रद्द करण्यात आली असून हवाईक्षेत्रही बंद करण्यात आले आहे.
विमानतळ आणि धावपट्टीला झालेल्या नुकसानीचा आम्ही आढावा घेत आहोत असे गव्हर्नर मिखाइल यांनी म्हटले आहे. तर रशियाने या ड्रोन हल्ल्यांसाठी युक्रेनला जबाबदार ठरविले आहे. सुमारे 12 ड्रोन्सद्वारे हा हल्ला झाला आहे. पेस्कोव्ह हे एस्टोनिया आणि लातविया या देशांच्या नजीक आहे. हे दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत.
एस्टोनिया हे पेस्कोव्ह शहरापासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर दुसरीकडे लातविया हा देश 60 किलोमीटर अंतरावर आहे. अशा स्थितीत युक्रेनने हे ड्रोन हल्ले केले असल्यास हे ड्रोन बेलारुसच्या हवाईहद्दीतून पेस्कोव्हपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता आहे. रशियाच्या सैन्याने काळ्या समुद्रात युक्रेनचे 4 ड्रोन नष्ट केल्याचा दावा आहे.
ब्रायन्स आणि ओरियोल क्षेत्रावरही 4 युक्रेनियन ड्रोन्स नष्ट केल्याचा दावा रशियाच्या सैन्याने केला आहे. वेनुकोवो विमानतळावरील हवाईक्षेत्र सध्या बंद करण्यात आले आहे. यापूर्वी मे महिन्यातही पेस्कोव्ह विमानतळावर हल्ला झाला होता.
मॉस्कोमध्ये सातत्याने हल्ले
रशियात मागील काही महिन्यांपासून सातत्याने मॉस्को आणि इतर शहरांवर ड्रोन हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमुळे आतापर्यंत जीवितहानी झालेली नाही. परंतु मॉस्कोमधील काही इमारतींचे नुकसान झाले आहे. 3 मे रोजी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे निवासस्थान क्रेमलिनवर 2 ड्रोन्सद्वारे हल्ला करण्यात आला होता.
रशियासाठी संकट ठरले ड्रोन वॉरफेयर
युक्रेन अशाप्रकारच्या ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यात कमी किमतीचे ड्रोन नष्ट करण्यासाठी रशियाला इलेक्ट्रॉनिक ड्रोनविरोधी उपकरणांसोबत महागड्या क्षेपणास्त्रांचा वापर करणे भाग पडेल. रशियन एस-400 च्य ाएका युनिटची किंमत सुमारे 7 हजार कोटी रुपये आहे. एका युनिटमध्ये 16 लाँचिंग व्हेईकल्स असतात. प्रत्येक व्हेईकलवर दोन मोठी आणि दोन छोटी क्षेपणास्त्रs असतात. तर युक्रेनकडून वापरण्यात येणाऱ्या ड्रोनची किंमत काही लाख रुपये आहे. डीजेआय क्वावकॉप्टर मॅविकची किंमत केवळ 2 लाख रुपये आहे. एका अमेरिकन एफ-35 लढाऊ विमानाच्या किमतीत अशाप्रकारचे 55 हजार ड्रोन खरेदी करता येऊ शकतात.









