पाक हेराला माहिती पुरविल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ बालासोर
डीआरडीओ अधिकाऱयाला एक पाकिस्तानी महिला हेराला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱयाची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती बालासोरच्या पोसीस अधीक्षक सागरिका नाथा यांनी रविवारी दिली आहे. अटकेची कारवाई झालेल्या डीआरडीओच्या अधिकाऱयाचे नाव बलराम डे असल्याचे समोर आले आहे. बालासोर पोलिसांनी हेरगिरीच्या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी स्थानिक न्यायालयात 5 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने चार दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. पोलीस आता आरोपी बलराम याची चौकशी करत पाकिस्तानी हेराबद्दल अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पाकिस्तानी हेराचे अन्य कुणी साथीदार आहेत का हे जाणून घेतले जाणार आहे.









