केंद्र सरकराने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांत बदल केला आहे. दंडाच्या रकमेत वाढ केली असून चाचणी करणं बंधनकारक केली आहे. वर्षापूर्वी देशभरात नवीन व सुधारित मोटार वाहन नियम लागू केला होता. केंद्राने यात थोडा बदल केला आहे. तुम्ही जर नविन ड्रायव्हिंग लायसन्स काढणार असाल तर या नियमाविषयी जाणून घ्या.
काय आहे नवीन नियमावली?
१) विना लायसन्सचं गाडी चालवताना पकडला गेला तर त्याला ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
२) आधार कार्डवर नोंद असलेल्या जिल्ह्याच्या बाहेर ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही.
३)स्थलांतरित किंवा प्रवासासाठी इतर जिल्ह्यांत असतात त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी त्यांच्या मूळ जिल्ह्यातच यावं लागणार.
४) ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी बायोमेट्रिक चाचणी द्यावी लागणार आहे. यासाठी वाहनधारकाचं ज्या जिल्ह्यातलं आधार कार्ड आहे, त्याच जिल्ह्यात जाऊन लायसन्स काढावं लागणार आहे.
५) फेसलेस चाचणीसाठी आधार कार्डवरूनच पत्त्याची तपासणी केली जाणार आहे.
हेही वाचा- हर्षनील प्रतिष्ठानची आर्थिक दुर्बलांसाठी धडपड
हेही वाचा- …तर आम्ही सर्वजण मातोश्रीवर परत जाऊ – संजय राठोड
Previous Articleहर्षनील प्रतिष्ठानची आर्थिक दुर्बलांसाठी धडपड
Next Article मोटरसायकल आणि कारची समोरासमोर धडक; तरूण गंभीर








