रहदारी पोलिसांची कायमस्वरुपी नेमणुकीची मागणी
बेळगाव :
कपिलेश्वर उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच झाली आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद झाल्याने सर्व वाहने कपिलेश्वर उड्डाणपुलामार्गे ये-जा करीत आहेत. त्यामुळे सकाळ व सायंकाळच्या सुमारास उ•ाणपुलावर प्रचंड गर्दी होत असून या गर्दीतून वाट काढण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी लागत आहे.
तानाजी गल्ली येथील रहिवासी व व्यापाऱ्यांनी उड्डाणपुलाला विरोध केल्यामुळे रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी एकतर जुना धारवाड रोड अथवा कपिलेश्वर उ•ाणपुलाचा वापर करावा लागत आहे. जुन्या धारवाड रोडपेक्षा शहरात येण्यासाठी कपिलेश्वर उड्डाणपूल जवळचा असल्याने उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होत आहे.
सकाळी 9 वाजल्यापासून 10.30 पर्यंत तर सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. शनिमंदिर परिसरात निमूळता रस्ता असल्यामुळे या वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. वाहने वळविण्यास जागा उपलब्ध नसल्याने वाहने कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे रहदारी पोलिसांनी यातून मार्ग काढावा, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.









