आंबोली / प्रतिनिधी
Driver killed in Amboli ghat by tempo collapse!
आंबोली घाटात टेम्पो कोसळून चालक ठार झालाय .ही घटना रात्री घडली हा टेम्पो सावंतवाडी वरून आंबोलीच्या दिशेने येत होता .आंबोली पोलीसांनी रात्री दरीत उतरून खात्री केली आंबोली घाटात नानापाणी वळणाच्या खालील बाजुस बोंडू वाहतुक करणारा ४०७ टेम्पो हा गोव्यावरून चंदगडच्या दिशेने येत असताना रात्रौ आंबोली घाटात चालकाचा टेम्पो वरून ताबा सुटल्याने टेम्पो दरीच्या दिशेने झाडावर आदळून अपघात झाला. आणि टेम्पो दिडशे फूट खोल दरीत दरीत पडून टेम्पो चालक पुंडलीक सुरेश आसगांवकर वय ३० रा. मांडवडे ता. चंदगड हा जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आजोबा भाऊ असा परिवार असून सहा वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते.









