फर्मागुडी-ढवळी बगलमार्गवरील उ•ानपुलावर अपघात
फोंडा : फर्मागुडी-ढवळी बगलमार्ग बांदोडा येथे उ•ानपुलावर क्रेन व आरएमसी क्रॉक्रिटवाहू ट्रकच्या झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. मिथुनकुमार साहा (40, रा. फर्मागुडी मूळ बिहार,) व बाबासाहेब पंडीत (31, रा. कुंडई, मूळ महाराष्ट्र) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची घटना काल रविवार दुपारी 11 वा. सुमारास घडली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रेन एनएल 01 एल 5828 फर्मागुडीहून ढवळीच्या दिशेने जात होती. आरएमसी कॉक्रीटवाहू ट्रक जीए 05 टी 5824 ढवळीहून फोंड्याच्या दिशेने आपल्या मार्गावरून सरळ येत होता. यावेळी क्रेनचालकाचा अचानक ताबा गेल्याने दुभाजकला ओलांडून सरळ धडक आरएमसी ट्रकला दिली. या धडकेत क्रेनचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर फेंडा येथील उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहे. तर आरएमसी ट्रकचालक व क्लिनर दोघेही किरकोळ जखमांवर सुखरूप बचावले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून हवालदार देविदास पर्येकर अधिक तपास करीत आहे.









