आंबोली । प्रतिनिधी
नागपूर येथून गोवा येथे जाणाऱ्या आयशर टेम्पोचे आंबोली घाटात नाना पाणी वळणावर ब्रेक फेल झाल्याने आयशर टेम्पो सुमारे शंभर फूट खाली कोसळला. या अपघातात टेम्पो चालक सुमीत दत्ताजी ऊजवे (३४) रा. नागपूर आठवा मैल ,दौलामेटी, माळा कॉलनी हे किरकोळ जखमी झाले . दैव बलवत्तर म्हणून टेम्पो शंभर फूट खाली कोसळून सुद्धा चालक सुमीत ऊजवे यांना किरकोळ दुखापत झाली. चालक टेम्पोत पावडर भरून नागपूर ते गोवा या मार्गाने जात होता .









