उन्हाळ्यात सांडगे,पापड,चिप्स,कुरडया असे वाळवणाचे बरेच प्रकार केले जातात. त्याचसोबत वर्षभर जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी वाळवणाची मिरची,मुळ्याची शेंग देखील केली जाते.आज आपण वर्षभर टिकणाऱ्या कारल्याच्या चिप्सची रेसिपी पाहणार आहोत.हे साध्या वरण भातासोबत देखील खूप चविष्ट लागतात. कुरकुरीत आणि चटपटीत चवीमुळे हे चिप्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतात. याशिवाय हे कमी साहित्यात आणि झटपट बनतात. चला तर मग जाणून घेऊयात याची रेसिपी.
साहित्य
कारले – अर्धा किलो
लिंंबू रस – १ मोठा चमचा
मीठ
कृती
सर्वप्रथम सर्व कारली धुवून घ्या. यानंतर कारल्याची दोन्ही टोके कापून त्याचे गोल गोल काप करून घ्यावेत.आणि त्यातील बिया काढून टाकाव्यात. आता सर्व कापांमध्ये १ चमचा मीठ घालून ते चोळून घ्यावेत. यानंतर २ ते ३ तास त्यावर झाकण ठेवावे. २ ते ३ तासांनी कारल्याच्या चिप्स ला पाणी सुटेल. ते पाणी पिळून घ्यावे. यानंतर त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मीठ टाकावे. सर्व चिप्स पुन्हा एकदा नीट चोळून घ्यावे. आणि एका ताटात पसरून ठेवून २ दिवस कडकडीत उन्हात वाळवावे. वाळलेले चिप्स एका हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









