जयपूर
राजस्थानात आता शालेय विद्यार्थिनींकडून हिजाब परिधात करण्यात आल्याने वाद उभा ठाकला आहे. यामुळे राज्य सरकारने आता राज्यातील शाळांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा आदेश दिला आहे. ज्या शाळेत सरस्वती मातेची मूर्ती, चित्र नसेल त्या शाळेच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी म्हटले आहे. जयपूरच्या गंगापोल येथील शासकीय शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आमदार बालमुकुंद आचार्य यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आचार्य यांनी शाळेत हिजाब घालून येणे चुकीचे असल्याची भूमिका मांडली होती. याविरोधात काही विद्यार्थिनींनी निदर्शने केली होती.









