कोल्हापूर :
करवीर निवासिनी अंबाबाई व वाडीरत्नागिरीवरील जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी आता तोकडे कपडे परिधान कऊन मंदिरात जाता येणार नाही. धार्मिकता व पावित्र्य जपण्याच्या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मंगळवारपासून (दि.13) ड्रेसकोड लागू केला आहे. भाविक स्थानिक असो अथवा परगावचा त्यांना आता अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनाला पारंपरिक कपडे घालूनच मंदिरात प्रवेश दिला जाईल असे देवस्थान समितीने प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे. अशा पध्दतीने मागील सात वर्षात तीन वेळा देवस्थान समितीने ड्रेसकोड लागू केला आहे.
देवस्थान समितीचे तत्कालीन अध्यक्ष महेश जाधव यांनी 2017-18 साली अंबाबाई व वाडीरत्नागिरीवरील जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेसकोड लागू केला होता. त्याची काही महिने अंमलबजावणी सुऊ राहिली. काही महिन्यातच परंतू कालांतराने ड्रेसकोड विस्मृतीत गेला. भाविकांना आठवण कऊन देण्यासाठी देवस्थान समितीने 2022 साली पुन्हा ड्रेसकोड लागू केला. परंतू त्याचाही विसर पडला. गेल्या काही महिन्यांपासून परगावचे तसेच स्थानिक महिला व पुऊष भाविक बिनधास्तपणे तोकडे कपडे परिधान कऊन अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनाला येत असल्याचे निदर्शनास येत आहेत. यातही बरेच तऊण महिला व पुऊष भाविक बरमुडा व स्लिव्हलेस कपडे परिधान कऊन मंदिरांमध्ये येत असल्याचे रोज दिसून येत आहे.
यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाकडे जाऊन थडकली होती. महासंघाच्या शिष्टमंडळाने तातडीने देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांची भेट घेऊन भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करावी या मागणीचे निवेदनही र्पाकवाडे यांना दिले होते. वरिष्ठांशी चर्चा कऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे नाईकवाडे यांनी शिष्टमंडळाला सांगितले होते. त्यानुसार काहीच दिवसांपूर्वी देवस्थान समितीचे प्रथासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याची चर्चा कऊन अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अनुसरूनच देवस्थान समितीने प्रसिद्धीस निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हंटले आहे की, कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई व वाडिरत्नागिरीवरील जोतिबाच्या दर्शनासाठी येणारे काही भाविक तोकडे कपडे परिधान करुन मंदिरामध्ये प्रवेश करताहेत. महाराष्ट्रातील काही मंदिरामध्ये दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड करणेत आला आहे. करवीर निवासिनी अंबाबाई हे देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. तेव्हा दर्शनासह धार्मिक विधींसाठी पुरुष व महिला भाविकांनी मंदिरात येताना तोकडे कपडे न घालून येणे टाळावे. पारंपारीक पद्धतीचे कपडे परिधानच कऊन मंदिरात यावे. असे केल्याने मंदिरामधील धार्मिकता व शक्तीपीठाच्या पवित्र्याचे पालन करण्यास मदत होणार आहे, असेही निवेदनात नमुद केले आहे.
- तोकडे कपडे असतील मंदिराच्या गेटवर अडवणार…
अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनासाठी कित्येक भाविक तोकडे कपडे परिधान कऊन मंदिरात येत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर तोकडे कपडे परिधान कऊन येणाऱ्या महिला व पुऊष भाविकांचे प्रमाण वाढतच आहे. भाविकांची ही कृती देवस्थानच्या धार्मिक व पावित्र्यासाठी योग्य नाही. त्यामुळे भाविकांसाठी ड्रेसकोड करावा लागत आहे. जे महिला व पुऊष भाविक तोकडे कपडे परिधान कऊन अंबाबाई व जोतिबा मंदिरात प्रवेश करत असतील, त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले जाईल. त्यांच्याकडून कोणतीही सबब ऐकून घेणार नाही.
शिवराज नाईकवाडे (सचिव : देवस्थान समिती)
- भाविकांना सोवळे मिळेल…
अनेक भाविक अंबाबाई व जोतिबा मंदिरात बरमुडा घालूनच येत होते. देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले जाते होते. एक मधला मार्ग म्हणून बहुतांश भाविक हे बाजारपेठेतून खरेदी केलेली लुंगी बरमुड्यावर बांधून मंदिरात येत होते. हे ही ड्रेसकोडचे उल्लंघन आहे. भविष्यात असे होऊ दिले जाणार नाही. जे महिला व पुऊष भाविक नजरचुकीने तोकड्या कपड्यात येतील, त्यांना गेट रोखून संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे सोवळे देवस्थान समितीकडून दिले जाईल. अंबाबाई व जोतिबा मंदिरपरिसरातील दुकानांनीही सोवळ्याचे व्यवस्था कऊन ती भाविकांनी द्यावी, असेही देवस्थान समितीकडून सांगण्यात येत आहे.
- असे कपडे चालणार नाहीत…
बरमुडा
स्लिव्हलेस ब्लाऊज अथवा टीशर्ट
बनियन
शॉर्टस्कर्ट
शार्ट
थ्रीफोर्थ
अंगप्रदर्शन करणारे कोणत्याही प्रकारचे अन्य फॅशनेल कपडे








