पुणे / प्रतिनिधी :
संवेदनशील शासकिय गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याप्रकरणी पुणे दहशतवाद विरोधी पथकाने डीफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑरगानायझेशन (DRDO) च्या संचालकाला अटक केली. तपासात त्याने पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या ऑपरेटीव्ह हस्तकाशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 मे रोजी पुणे येथील डीआरडीओच्या शास्त्रज्ञ कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्य बजावीत असताना पाकीस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह हस्तकाशी व्हॉटसअॅप व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलद्वारे तो संपर्कात असून, सामाजिक माहिती शेअर करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शास्त्रज्ञाने कर्तव्यावर असताना त्याच्याकडे अससेली गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा ठपका ठेवत त्याला संशयास्पद हालचालीवरून पुणे एटीएसने बेड्या ठोकल्या आहेत.
निवृत्तीला सहा महिने राहिले असताना मोबाईलच्या माध्यमातून ते पाकच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह असलेल्या महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. अधिक तपास एटीएसकडून सुरू आहे.









