श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या कठुआ पोलिसांनी शनिवारी चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी अखेरच्यावेळी मल्हार, बानी आणि सोजधरमध्ये दृष्टीस पडले होते. चारही दहशतवाद्यांवर 5 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. हे चारही दहशतवादी 8 जुलै रोजी झालेल्या माचेडी दहशतवादी हल्ल्यात आणि 11 जून रोजी चत्तरगला दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते. या हल्ल्यांमध्ये लष्कराचे 5 जवान हुतात्मा झाले असून 5 सैनिक जखमी झाले आहेत.









