बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार, कलामहर्षी के. बी. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त वरेरकर नाट्यासंघ येथे चित्रांचे प्रदर्शन भरले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर व तरुण चित्रकार विक्रम परांजपे यांनी विद्यार्थ्यांना चित्र कसे रेखाटावे, याचे प्रात्यक्षिक दाखविले.










