वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जनसंघाचे संस्थापक आणि काश्मीरसाठी बलिदान केलेले दिवंगत नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुखर्जी हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागामुळे अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी त्यांच्या असामान्य कार्याने देशासमोर एक उदाहरण घालून दिले आहे. भारताच्या प्रथम मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला होता. तथापि, काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरु यांच्या काश्मीर धोरणाचा निषेध करण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला आणि नंतर भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी मुखर्जी यांना श्रद्धांजली दिली.









