प्रतिनिधी /बेळगाव
डॉक्टर डेचे औचित्य साधून कर्नाटक स्टेट ओबीसी मोर्चाचे सचिव व विमल फौंडेशनचे चेअरमन किरण जाधव यांच्या हस्ते डॉ. सुरेश रायकर यांचा खास गौरव करण्यात आला.
डॉ. सुरेश रायकर गेली 41 वर्षे बेळगाव परिसरातील रुग्णांवर उपचार करीत आहेत. ते एक लोकप्रिय डॉक्टर असून, त्यांच्या या कामाची दखल घेऊन डॉ. दिवसाचे औचित्य साधून त्यांचा खास सत्कार करण्यात आला.
किरण जाधव, राजन जाधव, चैतन्य नंदगडकर आदी मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. सुरेश रायकर म्हणाले, गोरगरीब रुग्णांना आजारापासून मुक्त करणे हेच आमचे ध्येय असून, शेवटपर्यंत रुग्णांसाठी काम करणे हीच आमची सेवा आहे. यावेळी अभिषेक वेर्णेकर, अक्षय साळवी, अभिषेक माडुळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









