कोल्हापूर :
परिवर्तन महाशक्ती आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी पहिल्या टप्प्यात प्रचारात मुसंडी मारली आहे . डॉ. मिणचेकर यांनी पदयात्रेसह प्रत्येक गावात वैयक्तिक भेटीगाठीवर भर दिला आहे . पदयात्रेत युवकांच्या सहभागामुळे प्रचारात जोश वाढला आहे . डॉ . मिणचेकर यांनी मतदार संघातील अतिग्रे मजले व हातकणंगले गावातून पदयात्रा काढून ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद घेतले .
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील , पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, धनाजी पाटील , आनंदा पाटील, परेश गव्हाणे, अनिरुद्ध कांबळे, प्रज्योत कांबळे, महेंद्र कांबळे, पप्पू मुरूमकर, बंटी चोकाककर, व्ही . एम . पाटील (अतिग्रे ) , सुनिल कुंभोजे, बाबासो पाटील, अमित पाटील, विनायक कोठावळे, बाळासो गायकवाड, पारिसा पाटील, राजेंद्र रेडेकर, सुशांत पाटील, मीनल कोठावळे, केशव कोठावळे, अक्षय कोठावळे, यांच्यासह हातकणंगले शहरासह मजले, अतिग्रे गावातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, भीमशक्ती -शिवशक्ती संघटनेचे पदाधिकारी , नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .








