प्रतिनिधी / बेळगाव
नुकतीच नियती को-ऑप. सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये डॉ. सोनाली सरनोबत व भरत राठोड यांची चेअरपर्सन व व्हाईस चेअरमन म्हणून अनुक्रमे निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नियती सोसायटीची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने या सोसायटीची स्थापना करण्यात आली. बेळगाव चेंबर ऑफ पामर्सचे माजी अध्यक्ष रोहन जुवळी यांनी चेअरमन व डॉ. समीर सरनोबत यांनी व्हाईस चेअरमन म्हणून धुरा सांभाळली. त्यांनी अल्पावधीतच सोसायटी प्रगतिपथावर आणली. अनुप जवळकर, रोहीत देशपांडे, अॅड. भास्कर पाटील, प्रकाश मुगळी, नरसिंह जोशी, गजानन रामनकट्टी, प्रसाद घाडी, भूषण रेवणकर, सुनीता पवार, वरदा हप्पळी, मंजुळा हेगडे यांची निर्देशक म्हणून निवड झाली आहे. चीफ मॅनेजर अनुषा जोशी व दीपा प्रभुदेसाई उपस्थित होत्या.









