देवगड- प्रतिनिधी
देवगड येथील अनुष्ठान क्लिनीकच्या डॉ. सौ. सावली योगेश बोभाटे (४३, रा. देवगड सडा) यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. देवगड येथील गीतारत्न मेडिकलचे मालक योगेश बोभाटे यांच्या त्या पत्नी होत. पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.









