बेळगाव : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा, अशी विनंती श्रीनगर येथील मतदारांना डॉ. रवी पाटील यांनी केली. याप्रसंगी त्यांनी थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. अंजनेयनगर येथील माळमारुती एक्स्टेंशन परिसरात त्यांनी झंझावाती प्रचार केला. यावेळी सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. घरोघरी जाऊन डॉ. रवी पाटील यांनी आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यांनी महांतेशनगर येथील प्रभाग क्र. 36 मधील नगरसेवक व मनपातील सत्ताधारी पक्षाचे नेते राजशेखर डोणी यांच्यासह प्रचार केला.
भरघोस प्रतिसादामुळे आनंदित
यावेळी पत्रकारांशी बोलताना राजशेखर डोणी यांनी आपण महिला संघटना आणि विविध संस्थांना भेटी देऊन प्रचाराचे काम सुरू ठेवल्याची माहिती दिली. सकाळपासून झोपडपट्टीवासियांमध्ये प्रचार केला आणि सेक्टर क्र. 10, 12 मध्ये संपूर्ण अंजनेयनगर परिसरात प्रचार केला असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. रवी पाटील म्हणाले की, प्रचार मोहिमेला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही सर्वजण मतदारांचे आभार व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादामुळेच असे घडले असल्याचे सांगितले. यावेळी प्रचारासाठी नगरसेवक राजशेखर डोणी, दिग्विजय सिदनाळ, मदनकुमार भैरप्पन्नावर यांच्यासह जेष्ठ नागरिक, महिला, युवक प्रचारात सहभागी झाले होते. त्यानंतर संध्याकाळी मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, कोनवाळ गल्ली या भागात प्रचारदौरा पार पडला. त्यानंतर टिळक चौक, तानाजी गल्ली येथील ब्रह्मदेव मंदिर, कपिलेश्वर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉ. रवी पाटील यांनी बैठक घेऊन भाजपला पाठिंबा देण्याची विनंती केली.
आजचा प्रचार दौरा…
डॉ. रवी पाटील यांचा प्रचार दौरा सकाळच्या सत्रात बसव कॉलनी आणि वैभव नगर येथे पार पडणार आहे. संध्याकाळचा प्रचार दौरा कोनवाळ गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडे बाजार, बापट गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली या भागात संध्याकाळी प्रचार दौरा पार पडणार आहे.









