तरुणांसाठी विमान वाहतूक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
विमान वाहतूक क्षेत्रामध्ये नोकरीच्या अनेक संधी आहेत. उडान योजनेमुळे आज मनुष्यबळाची गरज वाढली आहे. त्यामुळे डॉ. रवी पाटील हेल्थ इन्स्टिट्यूटच्यावतीने ज्योती सायसर स्कूल ऑफ एव्हिएशनच्या सहकार्याने तरुणांसाठी विमान वाहतूक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शुक्रवारी डॉ. रवी पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्यावतीने अनुभवी विमान वाहतूक तज्ञ विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा प्रणाली, आदरातिथ्य सेवा याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विमानतळ ऑपरेशन्स, ग्राऊंड हँडलिंग, धोकादायक वस्तू व भारनियंत्रण लॉजिस्टिक्स या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आज अर्थार्जनाची उत्तम संधी आहे, असे डॉ. सोमशेखर पुजार यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहितीसाठी विजया ऑर्थो अँड ट्रॉमा केअर हॉस्पिटल, अयोध्यानगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ. एस. जी. पाटील, डॉ. सोमशेखर, शिल्पा, राजेश के., सौम्या टी. आर. आदी उपस्थित होते.









