बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ . रवी पाटील यांना दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज सकाळी वंटमुरी भागातील स्लम एरियामध्ये राहणाऱ्या जनतेची भेट घेऊन चर्चा केली. त्याचप्रमाणे शहराची कामे करणाऱ्या पी के क्वार्टरला येथील नागरिकांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी त्यांनी जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते व त्यांच्या समर्थकांसह वैभव नगरला भेट देऊन मतदान करून जनसेवेची संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.
तसेच विद्यागिरी येथे प्रचारादरम्यान नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला .ज्याप्रमाणे नागरिक सध्या भाजप पक्षाला साथ देत आहेत त्याच प्रमाणे येणाऱ्या निवडणूकीत मतदान करून आपले प्रेम दाखवून देण्याचे आवाहन उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी केला.
शनिवार खुट येथील व्यवसायिकांची भेट घेऊन यंदाच्या निवडणुकीत त्यांना मतदान करण्याची विनंती केली. यावेळी येथील सर्व व्यावसायिकांचे आणि येथील रहिवाशांची भेट घेतली.
याप्रसंगी मोठ्या संख्येने पक्षाचे नेते व त्यांचे समर्थक सहभागी झाले होते.












