प्रतिनिधी,कोल्हापूर
kolhapur : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रूपा शहा यांना सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर शालेय शिक्षणमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाल, मानपत्र व स्मृतीचिन्ह या स्वरूपातील जिल्हास्तरिय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात संचलनानंतर पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे तसेच जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सौ. शिल्पा पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे 2013-14 या वर्षासाठीचा जिल्हास्तरिय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर‘ पुरस्कार प्रा. डॉ. शहा यांना जाहीर झाला होता.
प्रा. डॉ. शहा यांनी राष्ट्रीय छात्र सेनेबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ लक्षणीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरचे मिळून प्रा. डॉ. शहा यांना आतापर्यंत 141 सन्मान लाभलेले आहेत. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर‘ या पुरस्काराने त्यांच्या सामाजिक कार्यातील वाटचालीला आणखी एक दाद मिळाली आहे आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









