ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना तीव्र ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
डॉ. आमटे यांना न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे मागील 10 दिवसांपासून त्यांना ताप आणि खोकला आहे. दरम्यान, 8 जूनला बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी डॉ. आमटे पुण्यात आले असता त्यांचा त्रास वाढला. त्यामुळे त्यांना तात्काळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरची सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. 2-3 आठवड्यांनंतर शरीराची ताकद वाढल्यावर कॅन्सरवरील उपचार सुरू होऊ शकतो. सध्या डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.








