आचरा प्रतिनिधी
आचरा गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या दी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई यांच्या मुंबई व्यवस्थापक मंडळाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी डॉ. प्रदीप शिवराम मिराशी, कार्याध्यक्षपदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी, सचिवपदी ऍड. सुभाष राजाराम आचरेकर यांची बिनविरोध निवड झाली. धी आचरा पिपल्स असोसिएशनची १०९ वी वर्षिक सर्वसाधारण सभा 6जुलै रोजी शारदाश्रम विद्यामंदिर, डॉ. भवानी शंकर मार्ग, दादर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित सभेत ही निवडून प्रक्रिया पार पडली.यावेळी उपकार्याध्यक्षपदी मोहम्मद इकबाल काजी सहसचिवपदी सूर्यकांत भगवान कोकम, खजिनदार मंगेश बाळकृष्ण आचरेकर निवड झाली. कार्यकारी सदस्य म्हणून प्रवीण काशिनाथ कानविंदे, मोहन गंगाराम आचरेकर, शशांक मोहनराव गुळगुळे, संजय सहदेव पाडावे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर तिन्ही स्थानिक कमिटीच्या पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









