प्रतिनिधी / बेळगाव
मलेशिया येथील यु. एस. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. दातो नरीमह बिंती समत यांनी बेळगाव येथे केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांची भेट घेतली. डॉ. कोरे यांना थॉमस जेफर्सन विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल केल्याबद्दल त्यांनी कोरे यांचे अभिनंदन करुन सत्कार केला.
याप्रसंगी डॉ. युएसएम विद्यापीठाचे संचालक डॉ. एच. बी. राजशेखर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









