आसाममधील कर्करोगतज्ञ : पॅन्सरविऊद्धच्या लढाईत अप्रतिम योगदान
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
आसाममधील प्रख्यात कर्करोगतज्ञ डॉ. रवी कन्नन यांना 2023 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून कर्करोग रुग्णांचे जीवन सुधारण्यासाठी भरीव योगदान देणाऱ्या कर्करोगतज्ञाचा मोठा गौरव झाला आहे. रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशनने ‘हिरो फॉर होलिस्टिक हेल्थकेअर’ श्रेणीसाठी यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. कन्नन यांची निवड केली आहे. आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जाते.
प्रख्यात पॅन्सरतज्ञ डॉ. रवी कन्नन यांच्यासोबत इतर तिघांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षणासाठी बांगलादेशच्या रक्षंद कोरवी, पर्यावरण संरक्षणासाठी तिमोर-लेस्टेचे युजेनियो लेमोस आणि शांतता व महिला वर्गांतर्गत फिलिपाईन्सच्या मिरियम कोरोनल फेरर यांची निवड करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रवी कन्नन यांचे रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
कन्नन 2007 पासून आसाममधील कछार पॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक म्हणून काम करत आहेत. याआधी ते चेन्नईच्या अड्यार पॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सर्जन होते. त्यांचे रुग्णालय दक्षिण आसामसह त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरमधील कर्करोगग्रस्त लोकांवर उपचार करण्यासाठी ओळखले जाते. डॉ. कन्नन यांनी गेल्या काही वर्षांत कर्करोगावरील उपचार गरीब लोकांसाठी परवडणारे बनवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यापैकी एक म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्यांनी छोटेखाली दवाखाने सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना आता आसाम आणि त्रिपुराच्या विविध भागात छोटी रुग्णालये उभारायची आहेत.
डॉ. कन्नन यांनी ईशान्येकडील राज्यांमध्ये पॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणण्याचे काम केले आहे. यादरम्यान रुग्णांच्या कुटुंबीयांच्या भावना आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. कन्नन यांना अनेक कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले. आसाममधील कछार जिह्यात त्यांनी 1981 मध्ये पहिले कर्करोग रुग्णालय 1981 मध्ये सुरू केले. त्यानंतर 1996 मध्ये एका एनजीओने कछार पॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर स्थापन केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वामुळे हॉस्पिटलचे रुपांतर सर्वसमावेशक कॅन्सर केअर हॉस्पिटलमध्ये झाले. 2007 मध्ये त्यांची हॉस्पिटलच्या संचालकपदी नियुक्ती झाली. डॉ. कन्नन कर्करोग, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, पॅलिएटिव्ह केअर अशा 28 विभागांचे प्रमुख आहेत. हे रुग्णालय दरवषी शेकडो रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात कर्करोग उपचार प्रदान करते.









