Dr. Kudos to Sanjeev Lingwat and Sandesh Gosavi
वेर्ले येथील श्री देव बांदेकर ग्रामविकास मंडळ व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने गावात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य सेवेत योगदान देणारे डॉ संजीव लिंगवत व गिर्यारोहक संदेश गोसावी यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ लिंगवत म्हणाले माझ्या घरच्या लोकांनी केलेला हा सत्कार आहे. खरंतर मी सामाजिक भावनेतून काम करत आहे. हे काम मी जे करत आहे ते म्हणजे परमेश्वराने आपल्याला समाजसेवा करण्यासाठीच पाठवले आहे . आणि ते कार्य आम्ही करत आहोत यावेळी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे. जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर., तालुका सचिव बाबली गावंडे, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड संतोष सावंत , सरपंच रुची राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, मंडळाचे सल्लागार गोविंद लिंगवत लाड ,जी राऊळ मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव लिंगवत ,उपाध्यक्ष अजित राऊळ ,सचिव प्रसाद गावडे ,सतीश लिंगवत ,सुनील राऊळ ,संदीप राऊळ, अनिल गावडे ,सुरेश गावडे ,अशोक गोसावी, संदेश गोसावी ,रवींद्र मेस्त्री, शरद राऊळ, प्रशांत घोगळे, मधुकर लिंगवत, सचिन राऊळ, प्रकाश मर्गज, पंढरी राऊळ ,चंद्रकला गोसावी पल्लवी राणे, महादेव जंगम, रवींद्र तावडे ,डॉ सई लिंगव,त डॉक्टर विष्णू खरात मानसी बागेवाडी ,प्राजक्ता रेडकर अनिल खाडे आधी उपस्थित होते . यावेळी सूत्रसंचालन श्री गोसावी यांनी केले यावेळी महिलांचा हळदीकुंकू निमित्ताने डॉ सौ लिंगवत यांनी मार्गदर्शन केले .
सावंतवाडी / प्रतिनिधी









