कै.डॉ. कमल कोडाकिनी यांच्या जन्मदिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. कोडकनी सुपरस्पेशालिटी नेत्र केंद्राने मोतीबिंदू आणि नेत्रासंबंधी समस्या असलेल्या रुग्णांची मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
हे शिबीर त्यांच्या अयोध्या नगर आणि मारुती गल्ली या दोन्ही शाखांमध्ये आयोजित केले होते. सुमारे 250 रूग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोतीबिंदू, डोळ्यांच्या समस्या आणि वेळेवर उपचार याबाबत समुपदेशन करण्यात आले.
या वेळी डॉ.शिल्पा कोडकनी, डॉ.आनंद पुराणिकमठ, डॉ.संजय पाच्छापुरे आणि डॉ.कोडकनी सुपरस्पेशालिटी नेत्र केंद्राच्या टीमने हे शिबिराला यशस्वी केले.
रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी कै.डॉ. कमल कोडकनी यांच्या जन्म दिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ अत्याधुनिक उपकरणे आणि लेन्ससह रुग्णांवर मोफत फाको शस्त्रक्रिया केल्या जातील असे कळविण्यात आले आहे.









