एसकेई सोसायटीत आयोजन
बेळगाव :
एसकेई सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर व माजी प्राचार्य एस. वाय. प्रभु यांनी नववर्षानिमित्त आरपीडी व जीएसएस कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. प्रारंभी प्रा. विजयकुमार पाटील यांनी स्वागत करून शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हिंदी घोषवाक्य तयार करून दिले. यानंतर डॉ. किरण ठाकुर यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. याप्रसंगी बालताना डॉ. किरण ठाकुर यांनी सिंगापूर, जर्मनी, अमेरिका या देशांतील स्वच्छतेची उदाहरणे देऊन एसकेईचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा. एस. वाय. प्रभु, प्राचार्य अरविंद हलगेकर, प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.









