वार्ताहर/ उचगाव
बेळगाव येथील मराठा को-ऑप. बँकेच्या नुकत्याच झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत लक्ष्मणराव होनगेकर यांची पुन्हा संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल रविवारी तऊण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक व लोकमान्य सोसायटीचे संस्थापक- चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते लक्ष्मणराव होनगेकर यांचा उचगाव येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
लक्ष्मणराव होनगेकर यांने मराठा को-ऑप. बँकेमध्ये गेली तीस वर्षे संचालक, चेअरमन ही पदे भूषवित सभासदांच्या हिताच्या योजना राबविल्या आहेत. बँकेच्या माध्यमातून बेळगाव तालुक्यातील अनेक शाळा, गरीब विद्यार्थी यांना शाळेचा गणवेश याबरोबरच इतर आर्थिक मदत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना बेळगाव शहर व ग्रामीण भागातील सभासदांनी निवडून देऊन बँकेच्या माध्यमातून सभासदांची पुन्हा सेवा करण्याची संधी दिली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मर्कंटाईल सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव हंडे, उचगावचे सुपुत्र आणि सध्या पुणे येथे प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर उत्तम तरळे, उचगाव ग्रा.पं.चे सदस्य एल. डी. चौगुले, अशोक चौगुले उपस्थित होते. यावेळी लक्ष्मणराव होनगेकर यांनी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून बँकेच्या सभासद व ग्राहकांची सेवा करण्याचे मनोगत व्यक्त केले.









