डॉ. केतन भाटीकर यांचे भाजपाला आव्हान
प्रतिनिधी / फोंडा
भाजपाच्या या धक्कातंत्राच्या खेळीनंतर प्रतिस्पर्धी डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्त्वाखालील मगो रायझिंग फोंडा पॅनल व भाजपामध्ये शह काटशहाचे राजकारण सुऊ झाले आहे. भाजपला आव्हान देताना डॉ. भाटीकर यांनी ‘भिवपाची गरज ना’ आम्ही उर्वरीत तेरापैकी बारा जागांवर आमचे उमेदवार निवडून आणू अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमासमोर बोलताना व्यक्त केली.
डॉ. भाटीकर यांनी फोंड्यात भाजपा व काँग्रेसमध्ये संगनमत झाल्याची टिकाही केली. आपल्या उमेदवारांवर माघार घेण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून मोठ्याप्रमाणात दबाव आले, त्यांना ऑफरही देण्यात आल्या. त्यांच्या नोकऱ्या व व्यावसाय बंद करण्याच्या धमक्याही आल्या. पण आपले सर्व बाराही उमेदवार एकसंघ असून ते कुठल्याही दबावाला बळी पडणार नाहीत. आपले सर्व उमेदवार हे प्रामाणिक आहेत. आम्ही फोंड्याच्या विकासासाठी काम कऊ, मतदार विश्वसाने निवडून देतील, असा विश्वास भाटीकर यांनी व्यक्त केला. मगो सोडून भाजपाच्या गोटात सामिल झालेल्या विद्या पुनाळेकर यांच्यावर आम्हाला भाष्य करायचे नाही. त्या चांगल्या कारणासाठी भाजपात गेल्याने त्यांना आमच्या शुभेच्छा. आम्ही कुणावर टिका करण्यापेक्षा आमचे सर्व बाराही उमेदवार निवडून आणण्यासाठी उर्जा व शक्ती खर्च करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रायझिंग फोंडाच्या 12 उमेदवारांची नावे जाहीर
यावेळी डॉ. भाटीकर यांनी आपल्या रायझिंग फोंडा पॅनलच्या उमेदवारांची नावे यावेळी जाहीर केली. प्रभाग 1 नंदकुमार डांगी, प्रभाग 2 राजेश सिनाय तळावलीकर, प्रभाग 3 शेरॉल डिसौजा, प्रभाग 5 सुशांत कवळेकर, प्रभाग 6 मंगेश कुंडईकर, प्रभाग 8 अॅड. प्रतिभा प्रदीप नाईक, प्रभाग 9 विन्सेंत पॉल फर्नांडिस, प्रभाग 10 मनस्वी परेश मामलेकर, प्रभाग 11 वेदिका विवेकानंद वळवईकर, प्रभाग 12 शिवानंद सावंत, प्रभाग 14 अनिल उर्फ सूरज नाईक व प्रभाग 15 गिताली तळावलीकर यांचा त्यात समावेश आहे.









