विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन वाहिली श्रद्धांजली
प्रतिनिधी / मडगाव
प्रसिद्ध कीटकशास्त्रज्ञ डॉ. जयवंतराव सरदेसाई यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी मडगावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. डॉ. सरदेसाई यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी रीघ लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
एक विद्वान, पण अत्यंत साधेपणाने राहणारे व्यक्तिमत्त्व हरपले हीच भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. यात गुरुवारी सकाळी भेट देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली. त्याशिवाय बहुतेक साऱ्या मंत्र्यांनीही भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मजूरमंत्री बाबूश मोन्सेरात, कृषिमंत्री रवी नाईक, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर तसेच आमदार आलेक्स सिक्वेरा, दिगंबर कामत, वेंझी व्हिएगस, कार्लुस फेरेरा, मायकल लोबो, दाजी साळकर, जेनिफर मोन्सेरात, क्रूझ सिल्वा, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आपचे अध्यक्ष अमित पालेकर आणि अन्य मान्यवरांचा त्यात समावेश राहिला.
त्यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, माजी आमदार लवू मामलेदार, उद्योगपती अनिल खंवटे यांनीही भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, लुईझिन फालेरो, माजी मंत्री दीपक पाऊसकर, फिलीप नेरी रॉड्रिक्स, विनोद पालयेकर, उद्योगपती दत्ता दामोदर नायक, माजी आमदार ग्लेन टिकलो, बाबाशान डिसा, भाई नायक, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व इतर काँग्रेस नेते, माजी कुलगुरू डॉ. अऊण, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व इतर बहुतेक नगरसेवक, फा. व्हिक्टर फेर्रांव, राजेश खंवटे, सावियो आलेमाव आणि राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी भेट देऊन सरदेसाई परिवाराचे सांत्वन केले.









