मालवण ,प्रतिनिधी
Dr. In S.S.Kudalkar High School, Rajarshi Shahumaharaj Memorial Day in excitement
डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल आणि प्राथमिक शाळेमध्ये राजर्षी छत्रपती शाहूमहाराज स्मृती शताब्दी वर्ष पूर्तता सोहळा साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ नंदिनी साटलकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन केले. जनसामान्यांनाच्या या राजर्षी केलेल्या प्रेरणादायी लोकाभिमुख कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी श्री. शिंदे सर, श्री.आठलेकर सर, सौ. कांबळे मॅडम, श्री.नाईक सर आपल्या मनोगतातून शाहू महाराजांच्या विचार – कार्याला नव्याने उजाळा दिला. यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्राची परब तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते. यानंतर प्रशालेच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा निकाल जाहीर करून मुलांना निकालपत्रक देण्यात आली.









