कुंडल:वार्ताहर
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा देशातील “सर्वोकृष्ठ सहकारी साखर कारखाना “पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे प्रदान करणेत आला.
हा पुरस्कार आ.अजित पवार,आ.जयंत पाटील,आ.सतेज पाटील,आ.बबनराव शिंदे,आ.दिलीप वळसे पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,आ.बाळासाहेब पाटील,आ.राजेश टोपे,आ.हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे अध्यक्ष आ. अरुण(अण्णा)लाड,उपाध्यक्ष उमेश जोशी,क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड,उद्योजक उदय लाड,जिल्हा परिषद सदस्य शरद लाड,कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे आणि सर्व संचालक यांनी स्वीकारला.
क्रांती कारखान्याचा देश पातळीवरील हा पुरस्कार 2021-22 सालात उच्च साखर उतारा विभागात कारखान्याने केलेले कार्यक्षमरित्त्या तांत्रिक कार्य, काटेकोर आर्थिक नियोजन आणि ऊस विकासात केलेल्या भरीव कामामुळे देणेत आला.कारखान्याने मागील गळीत हंगामात साखरेची चांगली गुणवत्ता,प्रदूषणाचे नियंत्रण, सांडपाण्याचे उत्सर्जन कमी करणे,पर्यावरण व्यवस्थापन ,औद्योगिक सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर,पीक फेरपालट व सेंद्रिय कर्ब वाढीसाठी काटेकोर नियोजन,सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन आदी उपक्रम राबविलेने हा पुरस्कार मिळाला.
Previous ArticleSangli News : मुचंडी येथे साडेसात किलो गांजा जप्त
Next Article चॅलेंजर्स, हिंडाल्को संघ विजयी








