न्हावेली / वार्ताहर
मळेवाड हेदुलवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या गुरुपौर्णिमेनिमित्त सावंतवाडीतील देवमाणूस म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेले डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा श्री. गजानन महाराज सेवा मंडळाच्या वतीने , केरी गोवा येथील उद्योजक श्री. पुरुषोत्तम वस्त यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. दुर्भाटकर यांनी मंडळाने केलेला सत्कार आपल्या कायम लक्षात राहील असे सांगितलं. या कार्यक्रमावेळी श्री गजानन महाराज सेवा ट्रस्ट चे पदाधिकारी आणि श्री गजानन महाराज भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.









