शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना गेल्या चोवीस तासात दोन मोठे धक्के बसले असून शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांच्यापाठोपाठ फडणवीस सरकारच्या काळात आरोग्य मंत्रालय सांभाळणाऱ्या डॉ. दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) यांनीसुद्धा शिंदे गटाच्या नेतृत्वातील शिवसेनेत () प्रवेश केला. बाळासाहेब भवनात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
“मला शिंदेसाहेबांनी काम द्यावं… मी प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यास तयार आहे. रस्त्यावरील शेवटच्या घटकांपर्यंत शिवसेनेचे विचार पोहोचवायचे आहेत. यासाठी माझ्या काळात सुरू झालेली बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना ही मुख्यमंत्री शिंदे पुन्हा सुरू करतील अशी ईच्छा व्यक्त माझी आहे.” अशी प्रतिक्रिया दिपक सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पक्षप्रवेशावेळी बोलताना सांगितले, कि “ज्या ज्या लोकांना आमचा विचार पटतो आहे ते ते आमच्या सोबत येत आहेत. दिपक सावंत यांचे पक्षात स्वागत आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला नक्कीच होईल.” अशी प्रतिक्रिय़ा दिली आहे.
विधान परिषदेचे माजी आमदार असलेले दिपक सावंत यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले आहे. देवेंद्र
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आरोग्य मंत्रीपदही भुषवले होते. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही त्यांनी मंत्रिपद भूषवले. जुलै २००४ मध्ये प्रथम विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या दिपक सावंत २००६ आणि २०१२ च्य़ा निवडणूकांमध्येही विजय संपादन केला होता. त्यानंतर मात्र तिसऱ्या वेळी त्यांना शिवसेनेकडून तिकीट नाकारण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








