प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावचे नामवंत बालरोगतज्ञ डॉ. अरुण धुमाळे यांना गोवा येथे नुकतेच उत्कृष्ट डॉक्टर पुरस्काराने गौरविण्यात आले. सांगली येथील ग्लोबस फाऊंडेशनच्यावतीने गोव्याच्या पार्करेजिस येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये बात्रा समूह संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. मुकेश बात्रा यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.
डॉ. अरुण धुमाळे 13 वर्षांपासून शिवाजीनगर येथे तसेच लेकव्ह्यू हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.









