पणजी : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने वास्को-होस्पेट रेल्वेचे दुपरीकरण प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्याने राज्यात याविऊद्ध आरोप-प्रत्यारोप होत असतानाच सरकारच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) काँग्रेसच्या काळातच तयार करण्यात आला होता, अशी माहिती दिली. डीपीआर काँग्रेसच्या काळातच तयार झाल्यामुळे विरोधाचे राजकारण होता कामा नये. 2008-2009 या काळात केंद्रात आणि राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. त्यावेळी मीही काँग्रेस सरकारात मंत्री होतो. त्याच काळात रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाचा डीपीआर तयार केला होता, असेही ते म्हणाले.
सरकारचा लोकांना खोटा अनुभव : फेरेरा
मांडवी नदीतून कसिनोला हद्दपार करण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. परंतु त्यावेळी खोटे बोलण्यात आले होते आणि आता रेल्वे दुपरीकरण प्रकल्पाबाबतही सरकारचा खोटा अनुभव लोकांना येत आहे, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी सांगितले.









