प्रवीण कांबळे/उंब्रज
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्यावतीने जयहिंद महारक्तदान यात्रेला गुरुवारी सकाळी कराड तालुक्यातील गोटे येथून सुरूवात झाली.सैनिकांसाठी एक लाख लोकांचे रक्तदान करण्याचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी महा रक्तदान यात्रेला आज सुरुवात झाली. गोटे येथे पै.चंद्रहारपाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातून आलेले युवा कार्यकर्ते व पैलवान यांचा गाड्यांचा ताफा महामार्गावर गोटे येथे थांबला येथे शुभारंभ करून या मोहिमेला सुरुवात झाली.दरम्यान पुणे येथील आर्मी हॉस्पीटल येथे ही महारक्तदान यात्रा जात असून येथे भव्य रक्तदान केले जाणार आहे.
यावेळी चंद्रहार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की,सांगली जिल्ह्यातून एक लाख युवक रक्तदान करणार आहोत.याची सुरुवात आर्मी हॉस्पीटल वानोडी येथून सुरुवात केली आहे. जमा झालेले रक्त देशासाठी लढणाऱ्या जवानांसाठी सुपूर्द करणार आहोत.येत्या 3 ते 4 महिन्यात जयहिंद रक्तदान यात्रा प्रत्येक गावात जाणार आहे. यातून 1 लाख युवक रक्तदान करतील असा संकल्प केला असल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
Previous Articleरत्नागिरीच्या खो-खो पटू, आरती कांबळेआणि अपेक्षा सुतारचे ‘शिवछत्रपती’ पुरस्कारसाठी नामांकन
Next Article Kolhapur : एक अतुट नाळ आपल्या गावाशी…









