बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या शहापूर विभागीय फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात भरतेश इंग्लिश संघाने डी. वाय. सी. भरतेश संघाचा 3-0 तर मुलींच्या गटात भरतेश संघाने ज्ञानमंदिर संघाचा 2-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. सुभाष लेले मैदानावर खेळविण्यात आलेल्या शहापूर विभागीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन कर्नाटक दैवेज्ञ स्कूलचे सभासद गुरु अणवेकर, सौरभ रेवणकर, बापू देसाई, अनिल मुगळीकर, कमल, बलराम जैनोजी, मगदूम व मॅथ्यू लोबो आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते चेंडू लाथाडून व खेळाडूंची ओळख करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मुलींच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भरतेश संघाने डी. वाय. भरतेशचा 2-0 तर ज्ञानमंदिरने भातकांडेचा 1-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भरतेश संघाने ज्ञानमंदिरचा 1-0 असा पराभव केला. मुलांच्या गटात पहिला उपांत्य फेरीचा सामना भरतेश संघाने भातकांडे संघाचा 1-0 असा पराभव केला. भरतेशतर्फे स्वयम कपिलेश्वरीने एकमेव गोल केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डी. वाय. भरतेश संघाने ज्ञानमंदिरचा 2-1 असा पराभव केला. डी. वाय. भरतेशतर्फे श्रीधरने 2 गोल केले. तर ज्ञानमंदिरतर्फे हरिशने 1 गोल केला. अंतिम सामन्यात भरतेशने डी. वाय. भरतेशचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात स्वयम कपिलेश्वरी, मुजफर वडगावकर व स्वयम मलिक यांनी प्रत्येकी 1 गोल केला. पंच म्हणून बापू देसाई यांनी काम पाहिले.
Previous Articleबीडीएफएतर्फे अमित पाटील यांचा उपाध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









