संधीचा लाभ घेण्याचे पत्रकार परिषदेत ग्राहकांना आवाहन
बेळगाव : बेळगावमध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘बीएससी-द टेक्स्टाईल मॉल’तर्फे श्रावण महिन्याचे औचित्य साधून डबल डिस्काऊंट सुविधा देण्यात येत आहे. 6 ऑगस्टपासून बीएससीमध्ये खरेदी केलेल्या कपड्यांवर 10 टक्के +10 टक्के अशी डबल सूट देण्यात येणार असून, ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीएससी मॉलचे संचालक चंद्रशेखर यांनी केले. या सुविधेसंदर्भात बीएससीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दावणगेरे येथे बीएससी टेक्स्टाईल मॉल सर्वप्रथम सुरू करण्यात आला. दरवर्षी वर्षपूर्तीनिमित्त बीएससीतर्फे 10 टक्के सवलत देण्यात येते. तसेच दावणगेरे येथे डबल डिस्काऊंट सुविधा प्रथम सुरू करण्यात आली. तेथे मिळणारा लक्षणीय प्रतिसाद लक्षात घेऊन बेळगावमध्येही ही सुविधा आम्ही देत आहोत. येत्या 6 ऑगस्टपासून येथील सर्व उत्पादनांवर डबल डिस्काऊंट मिळणार आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा अधिक महत्त्वाचा असून या महिन्यात नागपंचमी, वरमहालक्ष्मी हे महिलांसाठीचे तर राखी हा पुरुषांसाठीचा सण येतो. या सणानिमित्त खरेदी होते. त्यामुळे जेव्हा खरेदी अधिक प्रमाणात केली जाते, तेव्हाच डबल डिस्काऊंट योजना दिल्यास ग्राहकांना त्याचा लाभ होतो. म्हणून श्रावणात आपण ही सुविधा देत असल्याचे मृणाल बंकापूर यांनी सांगितले.
‘या पहा आणि खरेदी करा’
‘या पहा आणि खरेदी करा’ हे आमचे घोषवाक्य असून या योजनेंतर्गत खरेदी केलेल्या वस्त्रप्रावरणांसाठी एक्स्चेंज सुविधासुद्धा उपलब्ध आहे. ही बीएससीची विशेष योजना आहे. शिल्लक माल खपविण्यासाठीचा हा स्टॉक क्लिअरन्स सेल नाही. तर नवीन उत्पादनांवरच डबल डिस्काऊंट देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी वेद बंकापूर उपस्थित होते. सूत्रसंचालन मार्केटिंग व्यवस्थापक इरण्णा शिवशेट्टी यांनी केले.









