विजेते संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
बेळगाव : बेळगाव तालुका सार्वजनिक शिक्षण खाते आणि वनिता विद्यालय इंग्रजी माध्यमतर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय प्राथमिक-माध्यमिक नेटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने दुहेरी मुकुट, तर वनिता विद्यालय, डीपी हायस्कूल संघाने आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. सीपीएड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन वनिता विद्यालयाच्या प्रा. डॉ. निर्मला सुनत, बेळगाव शारिरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवण्णावर, सिल्व्हीया डिलिमा, माजिया व एस. व्ही. हेगनायक, चेस्टर रोजारियो, संजय चाल्स, मारिया बेलवाड बालेश यादूरी आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते. अंतिम निकाल : 14 वर्षाखालील मुलांचा गट- सेंट झेवियर्स स्कूलाने लिटल स्कॉलर स्कूल कणबर्गीचा 7-0 अशा तर मुलींचा गटात- सेंट झेवियर्स स्कूलने लिटल स्कॉलर स्कूल कणबर्गीचा 5-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. 17 वर्षाखालील मुलांचा गटात- वनिता विद्यालय स्कूलने सेंट झेव्हियर्सचा 8-5, तर मुलींचा गटात- डी.पी.स्कूलने वनिता विद्यालय स्कूलचा 4-3 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगाव शहर पी.ई. ओ. जे बी पटेल आणि प्राचार्य डॉ. निर्मला सुनत यांच्याहस्ते बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडले.









