तालुकास्तरीय शालेय हॉकी स्पर्धा
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या शहर तालुकास्तरीय मुला-मुलींच्या हॉकी स्पर्धेत जी. जी. चिटणीस व एम. आर. भंडारी शाळेने दुहेरी मुकुट संपादन केले. मदनी शाळेच्या मैदानावर प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या गटात जी. जी. चिटणीसने विजेतेपद तर कॅन्टोन्मेंट स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक गटात एम. आर. भंडारी शाळेने विजेतेपद तर इस्लामिया शाळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खलील कोतवाल, साकिब बेपारी, प्रवीण पाटील, जयसिंग धनाजी, रामलिंग परीट, प्रशांत देवधनम यांनी परिश्रम घेतले. वरील विजेते दोन्ही संघ आगामी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जीजी चिटणीस व एमआर भंडारी दोन्ही संघातील खेळाडू तीन वर्षे सातत्याने जिल्हा पातळीवर आपली चमक दाखवत आहेत.









