भातकांडे, हेरवाडकर विजेते तर केएलएस उपविजेता
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी क्लस्टर प्राथमिक विभाग व टिळकवाडी माध्यमिक विभाग चिटणीस स्कूल व राजपूत बंधू स्कूल आयोजित शटल बॅडमिंटन स्पर्धेत डी. पी. स्कूलने प्राथमिक व माध्यमिक विभागात विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट पटकाविले. तर मुलांच्या गटात एम. व्ही. हेरवाडकरने केएलएसचा तर भातकांडेने केएलएसचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. तुकाराम लोकमंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन ओरिएंटल स्कूलचे सभासद संजय बाळेकुंद्री, स्कूलच्या मुख्याध्यापिका सुवर्णा नागनाथ, संजीवनी तरळे, एस. वाय. मक्कन्नावर, डॉ. नवीना शेट्टीगार, टिळकवाडी विभागीय शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते बॅडमिंटन स्पर्धेचा फटका मारुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात गजाननराव भातकांडे संघाने एम. व्ही. हेरवाडकर संघाचा 2-1 अशा गेम्स्मध्ये तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केएलएसने मुक्तांगणचा 2-0 अशा गेम्स्मध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत गजाननराव भांतकांडे संघाने केएलएसचा 2-1 अशा गेम्स्मध्ये पराभव करुन विजेतेपद मिळविले. मुलींच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डी. पी. संघाने मुक्तांगण संघाचा 2-0 तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हेरवाडकरने केएलएसचा 2-1 अशा गेम्स्मध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मात्र डी. पी. संघाने हेरवाडकरचा 2-0 असा सरळ गेम्स्मध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
17 वर्षाखालील माध्यमिक गटात मुलींच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डी. पी. संघाने एम. व्ही. हेरवाडकर संघाचा 2-0 तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केएलएसने ओरिएंटल संघाचा 2-1 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात केएलएसचा 2-0 असा पराभव केला. डी. पी. तर्फे तनिष्का कोरीशेट्टी व मिचीली यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर संघाने ओरिएंटल संघाचा 2-0 अशा गेम्स्मध्ये तर केएलएसने मुक्तांगण संघाचा 2-0 असा गेम्स्मध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत एम. व्ही. हेरवाडकर संघाने केएलएसचा 2-1 अशा गेम्स्मध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. हेरवाडकरतर्फे तनुष्क व साईश यांनी सुरेश खेळाचे प्रदर्शन केले. तर केएलएसतर्फे प्रथम हिरेमठ व तेजस बेळगावकर यांनी उत्तम खेळ खेळला. सामन्यानंतर विवेक पाटील, सोमशेखर हुद्दार, सिल्विया डिलिमा, प्रसन्ना कुरबेट, जयसिंग धनाजी, उमेश मजुकर यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अर्जुन भेकणे, मॅथ्यू लोबो, संतोष दळवी आदी उपस्थित होते. तर पंच म्हणून सिल्विया डिलिमा व उमेश मजूकर यांनी काम पाहिले.









