मुलांमध्ये सेंटपॉल्स, सेंट मेरीज विजेते
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या चव्हाट गल्ली, फुटबॉल क्लस्टर व कॅम्पविभागीय शेटल बॅडमिंन्टन स्पर्धेत मुलींच्या गटात सेंट जोसेफ संघाने सेंट झेवियरस संघांचा पराभव करून दुहेरी मुकूट मिळविले. तर मुलांच्या गटात सेंट मेरीजने सेंटपॉल्सचा तर सेंटपॉल्सने मौलाना आझाद संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. महाबळेश्वरनगर येथील बेळगाव जिल्हा बॅडमिंन्टन संघटनेच्या बॅडमिंन्टन सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन बेळगाव जिल्हा बॅडमिंन्टन संघटनेचे सचिव अशोक पाटील यांच्याहस्ते नेटला हार घालून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक गटात मुलांच्या पहिल्या उपांत्यफेरीत सेंटमेरीज संघाने कॅन्टोमेंन्ट संघाचा 2-0 असा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्यफेरीत सेंटपॉल्सने एमव्हीएमचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश अंतिम सामन्यात सेंटमेरीज सेंट पॉल्सचा 2-1 अशा सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तर मुलींच्या गटात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट जोसेफने एमव्हीएमचा तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने वनिता विद्यालयाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात सेंट जोसफने सेंट झेवियर्सचा 2-0 असा सेटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 17 वर्षाखालील माध्यमक गटात मुलांच्या उपांत्य सामन्यात सेंटपॉलने सेंट झेवियर्सचा 2-1 तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात मौलाना आझादने एमव्हीएमचा 2-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात सेंटपॉलने मौलाना आझाद संघाचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट जोसेफने वनिता विद्यालयाच्या 2-1 तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने एमव्हीएमचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत समावेश केला. सेंट जोसेफने सेंट झेवियरचा 2-0 असा पराभव करीत स्पर्धेंचे विजेतेपद पटकाविले.









