महालक्ष्मी बसरीकट्टी, मराठी विद्यानिकेतन विविध गटात उपविजेते
बेळगाव : लायन्स क्लब ऑफ टिळकवाडी, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुला-मुलींच्या खो-खो स्पर्धेत मलप्रभा हायस्कूल चापगाव संघाने दुहेरी मुकूट पटकाविले. तर मुलोच्या गटात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मराठी विद्यानिकेतनच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या खो-खो प्रसंगच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर लायन्स डॉ. विश्वनाथ भांदुर्गे, श्रीकांत मोरे माजी प्रांतपाल, श्रीकांत शानभाग, सेक्रेटरी, मल्हारी दिवटे, खजिनदार, प्रथमेश टपाले व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपसचिव डॉ. दीपक देसाई, कार्यकारी सदस्य बाळाराम पाटील, बेळगाव खो-खो संघटनेचे सदस्य विवेक पाटील व लायन्स क्लब ऑफ टिळकवाडीच्या संपर्कप्रमुख सामाजिक कार्यकर्त्या वैशाली नायडू, ए. बी. शिंत्रे, वाय. सी. गोरल आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. प्रारंभी मराठी विद्यानिकेतनच्या संगीत समुहाने स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. मुख्याध्यापक समरसिंग पाटील यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.
बाळाराम पाटील यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व खेळाडूंना शपथ देण्यात आली. श्रीकांत मोरे सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. खो खो स्पर्धामध्ये मुलांच्या विभागात घेण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मलप्रभा हायस्कूल चापगावने महालक्ष्मी हायस्कूल बसरीकट्टी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तर तृतीय क्रमांकाच्या सामन्यात संभाजी हायस्कूल बैलूरने सह्याद्री हायस्कूल गोधोळीचा पराभव करून तृतिय क्रमांक पटकाविला. गोधोळीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या विभागात अंतिम सामन्यात मलप्रभा हायस्कूल चापगावने मराठी विद्यानिकेतनचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तृतीय क्रमांकाच्या समान्यात महात्मा गांधी हायस्कूल गौंडवाडने संभाजी हायस्कूल बैलूरचा पराभव करून तृतिय क्रमांक पटकाविले. गौंडवाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. वरील मान्यवरांच्याहस्ते विजेत्या, उपविजेत्या तिसरा व चौथ्या क्रमांकाच्या संघाना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राजाभाऊ पाटील व प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते.









