प्राथमिक-माध्यमिक बॅडमिंटन संघ राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र, दोन्ही विभागात शिर्शी जिल्ह्याला उपविजेतेपद
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव विभागीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत प्राथमिक-माध्यमिक मुलींच्या गटात बेळगाव जिल्हा संघाने दुहेरी मुकूट पटकाविले आहे. प्राथमिक व माध्यमिक गटातील खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. शिरसी येथे घेण्यात आलेल्या बेळगाव विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत 17 वर्षाखालील माध्यमिक मुलींच्या विभागात बेळगाव जिल्ह्याने उपांत्यपूर्व सामन्यात बागलकोट जिल्ह्याचा 2-0 असा पराभव केला. ऐकेरीत बेळगावने बागलकोटचा 21-6, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव केला. तर दुहेरीत बेळगावने बागलकोटचा 21-5, 21-6 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीत बेळगावने धारवाड जिल्ह्याचा 2-0 अशा गेम्समध्ये पराभव केला. एकेरीत बेळगावने धारवाडचा 21-7, 21-5 तर दुहेरीत 21-5, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव करीत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला.
अंतिम सामन्यात बेळगावने शिरसीचा 2-1 अशा गेम्समध्ये पराभव केला. एकेरीत बेळगावने शिर्शीचा 21-7, 21-7 अशा तर दुहेरीत 21-13, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. बेळगावच्या डी. पी. स्कूलच्या विद्यार्थीनी तनिष्का कोरिशेट्टी, मिशेल फर्नांडीस, ध्वनी कुलकर्णी यांचा समावेश होता. प्राथमिक विभागात बेळगावने उपांत्यफेरीच्या सामन्यात धारवाड जिल्ह्याचा 2-0 असा पराभव केला. एकेरीत बेळगावने धारवाडचा 21-18, 21-19 तर दुहेरीत 21-16, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बेळगावने शिर्शी जिल्ह्याचा 2-0 असा पराभव केला. एकेरीत बेळगावने शिर्शीचा 21-18, 21-27 तर दुहेरीत 22-20, 21-17 अशा गेम्समध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले. बेळगावच्या सेंट झोसेफच्या खेळाडू आदीत्य असुंडी, अलरीना असुंडी, अल्ड्रीना अँथोनी व तेश्वा आणि दृष्टी आदी खेळाडूंचा समावेश आहे. या दोन्ही संघाना सिल्वीया डिलीमा व मिनाक्षी मन्नोळकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन तर डी. पी. स्कूलच्या प्रा. रोशम्मा व उपप्राचार्य इलिमा यांचे प्रोत्साहन लाभत आहेत.









