बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्राथमिक गटात बालिका आदर्शने वडगाव विभागाचा तर माध्यमिक गटात बालिका आदर्शने शहापूर विभागाचा पराभव करुन दुहेरी मुकुट पटकाविला आहे. दोन्ही संघ जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बालिका आदर्श विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाच्या संघात श्रावणी पाटील, श्रद्धा पाटील, वैष्णवी नावगेकर, अनन्या अनगोळकर, कार्तिकी लोकरूचे, साक्षी, संध्या पवार, मनस्वी बिर्जे, दीया मोहीते, समृद्धी पाटील, रोहीनी नागराळे यांचा समावेश होता.
माध्यमिक गटात उपांत्य सामन्यात बालिका आदर्शने कॅम्प झोनमधील विद्यानिकेतन शाळेला 22-3 अशा फरकाने पराभव करून अंतिम सामन्यात बलिका आदर्शने महांतेशनगर झोनमधील कणबर्गी शाळेचा 28-5 अशा फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संघामध्ये मनाली मोहिते, पुष्पा मनोळकर, स्वानंदी पावले, साक्षी जांगळे, सावरी बाळेकुंद्री, शितल सुतार, जानवी पाटील, लिलावती अनगोळकर, अंजली काटगाळकर, प्रणाली अनगोळकर याचा समावेश होता. पंच म्हणून एल. बी. नाईक, नामदेव पाटील, अश्विनी मेटकर, मंजुनाथ देवगानट्टी, हैबती, महावीर गुडगौडर, महेश पुजारी यांनी काम पाहिले. सर्व खेळाडूंना शाळेचे चेअरमन जी. एन. फडके व सहसचिव अंनत गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मंजुनाथ गोल्लीहळी यांचे प्रोत्साहन मिळाले तर उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









