खरेदीवर 20 टक्के सूट : पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : श्रावण मासानिमित्त तसेच येणाऱ्या विविध सणांसाठी बीएससी मॉलने ग्राहकांना डबल डिस्काऊंटचा धमाका सुरू केला आहे. रविवार दि. 21 पासून या योजनेला प्रारंभ होत असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीएससी मॉलचे व्यवस्थापकीय संचालक बी. यू. चंद्रशेखर यांनी केले आहे. बी. एस. चन्नबसाप्पा अँड सन्स टिळकवाडी-बेळगाव या मॉलला ग्राहकांनी आजपर्यंत मोठी पसंती दिली आहे. इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा आपल्याकडे सर्वच कपडे स्वस्त आहेत. त्यामुळेच ग्राहकांनी आमच्यावर विश्वास दाखवून आजपर्यंत सहकार्य केले आहे. बेळगावसह गोवा, महाराष्ट्र येथूनही ग्राहकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे. 2022 पासून सुरू झालेला हा मॉल तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे.
बीएससी मॉलमध्ये ग्राहकांना आजपर्यंत आम्ही 10 टक्के सवलत प्रत्येक खरेदीवर दिली आहे. मात्र, आता ती 20 टक्के दिली जाणार आहे. ग्राहकांना उत्तम प्रतीच्या कपड्यांबरोबरच अत्यंत स्वस्त दरात आम्ही हे कपडे उपलब्ध केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे फ्रेश आणि नवीन स्टॉकवर ही सवलत दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एकाच ठिकाणी विविध प्रकारचे आणि विविध प्रतीचे कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध करणारा बेळगाव जिल्ह्यातील हा एकमेव मॉल आहे. तेव्हा या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी कळविले आहे. प्रारंभी व्यवस्थापक अमजद जमादार यांनी उपस्थितांचे स्वागत करून उद्देश स्पष्ट केला. इरण्णा शिवशेट्टी यांनी आभार मानले.









